June 20, 2025 4:46 PM June 20, 2025 4:46 PM

views 10

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आलं.   नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. &n...

June 19, 2025 2:44 PM June 19, 2025 2:44 PM

views 13

मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, तसंच किनारपट्टी जवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत.    पालघर पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे,...

June 18, 2025 9:48 AM June 18, 2025 9:48 AM

आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर गृहमंत्रालयाने आज आणि उद्या आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा दिला आहे. राज्य सरकारने सर्व सुरक्षा काळजी घ्यावी असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. राज्यात पावसाचा इशारा असला तरीही उकाडा आणि दमट वातावरण कायम राहाणार असून तापमान 38 अंश सेल्सिअस राहाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान बिस्वनाथ आणि लखीमपूर जिल्ह्यातील 10 गावांना पुराचा वेढा कायम आहे.

June 12, 2025 3:08 PM June 12, 2025 3:08 PM

views 13

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस

जळगाव शहरासह जिल्ह्यात काल रात्री  प्रचंड वादळी वाऱ्यांसह तुफान पावसाने हजेरी लावली. या पावसाचा जोर इतका प्रचंड होता,की रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांना चालणे देखील अवघड झालं होतं असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.    परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि भर पावसात घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावं तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन क्रमांक 1077 वर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं  केलं आहे.

June 10, 2025 3:41 PM June 10, 2025 3:41 PM

views 27

नांदेडमध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान

नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण आणि भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या पावसामुळं झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं तर, या नुकसानीचे तातडीनं पंचनामे केले जातील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.

June 4, 2025 8:15 PM June 4, 2025 8:15 PM

views 12

देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर कायम

  मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली ६४३ गावं पुरामुळं बाधित झाली असून, एक लाख ६४ हजार ८०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. पुरात ३५ हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, पोलिस, निमलष्करी दल, रेडक्रॉस, अग्निशमन दलांकडून पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे.   दरम्यान, मणिपूरमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून  बहुतांश नद्यांचं पाणी उतरलं आहे.    आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून २१ जिल्ह्यांमधल्या ६ ...

May 29, 2025 8:08 PM May 29, 2025 8:08 PM

views 16

राज्यात ठीकठिकाणी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  सध्या जायकवाडी धरणात २९ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.    मान्सूनविषयी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेत संभाव्य पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळे घेऊन सांगली जिल्ह्यात राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक तैनात केलं आहे.  जिल्हा आ...

May 27, 2025 3:23 PM May 27, 2025 3:23 PM

views 14

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विक्रोळी भागात काल संध्याकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. लातूरमध्ये काल संध्याकाळी झाडावर वीज कोसळून दोघे मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले.   रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस आहे आ...

May 22, 2025 3:30 PM May 22, 2025 3:30 PM

views 13

पावसाळ्यासाठी प्रशासन सज्ज, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पावसाळ्यात जीवीत आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवसांसह २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते मोसमी पावासाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.   आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी.  दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययो...

May 15, 2025 3:14 PM May 15, 2025 3:14 PM

views 17

देशातल्या अनेक भागात पावसाची शक्यता

देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि ईशान्येकडच्या प्रदेशात पुढले २ ते ३ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर महाराष्ट्रात कोकण, गोवा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, आणि अंदमान-निकोबार द्वीप समूहांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.    येत्या दोन दिवसांत उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे. पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, पुडुचेरी, करैकल, आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात आज, तर बिहार आणि ओदिशामध्ये उद्या...