August 18, 2025 1:45 PM August 18, 2025 1:45 PM

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर पोहोचली आहे. काल चंबा आणि कांगरा जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती संचालन केंद्रानं दिली. दरडी आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यभरातले जवळपास ४०० रस्ते बंद आहेत.

August 12, 2025 7:39 PM August 12, 2025 7:39 PM

views 21

कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुढचा आठवडाभर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

August 5, 2025 7:13 PM August 5, 2025 7:13 PM

आगामी ४ दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात आजपासून पुढचे चार दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.   कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून, अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशा असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात हवामान बदलेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे...

July 26, 2025 8:34 PM July 26, 2025 8:34 PM

views 6

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, धरणाच्या पाणी पातळीत वाढ

महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जिल्ह्यात संततधारेमुळे अनेक भागांतल्या नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच धरणांतून सकाळपासून...

July 21, 2025 7:52 PM July 21, 2025 7:52 PM

views 3

येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.     पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे.  या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.  मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितलं.   दरम्यान, आगामी ४८ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाण...

July 18, 2025 8:16 PM July 18, 2025 8:16 PM

views 17

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे ६३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्याने नुल्ला लेह मधे अचानक पूर उद्भवला आहे. गेल्या २ दिवसात वीज अंगावर कोसळून किंवा पावसामुळे बांधकाम कोसळून ४४ जण दगावले. बलुचिस्तानमधेही अतिवृष्टीमुळे १६ जणांचा मृत्यू झाला.

July 8, 2025 3:12 PM July 8, 2025 3:12 PM

views 4

राज्याच्या विविध भागात पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.  गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तिरोडा तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसामुळे  जिल्ह्यातले २१ मार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.   गडचिरोली जिल्ह्यातही रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, नद्या- नाल्यांना पूर आल्यानं १६ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. द...

June 30, 2025 10:15 AM June 30, 2025 10:15 AM

views 56

पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत

पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल जोगिंदरनगर, कसौली आणि पांवटा साहिब गावात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातल्या सर्व मोठ्या नद्यांना पूर आला आहे तसंच धरणांतूनही नियमितपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे 129 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.   पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे आतापर्यंत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. नागरिकांनी नदीजवळ जाऊ नये, अनावश्यक पर्यटन टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांच...

June 24, 2025 5:36 PM June 24, 2025 5:36 PM

views 36

नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नंदूरबार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.

June 22, 2025 7:13 PM June 22, 2025 7:13 PM

views 8

पुण्यातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी या वाड्यांचं पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वाडे रिकामी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने यंदा ११६ धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावली असून त्यापैकी ७६ वाडे रिकामी करण्यात आले आहेत.