October 19, 2025 10:09 AM

views 121

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

September 30, 2025 6:51 PM

views 44

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास…

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होईल. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून हा पाऊस परतला आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून तर १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परत जाईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारीचा प्रवास प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

September 15, 2025 7:49 PM

views 47

राज्यात पावसाचा जोर, अनेक भाग जलमय

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे शहरात काल झालेल्या पावसाचा फटका विमानसेवेला बसला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात येणारी १४ विमानं अहमदाबाद, हैदराबाद, सूरत, मुंबई या विमानतळांवर उतरवण्यात आली. तर पुणे विमानतळावरची तीन उड्डाणं माघारी उतरली. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही विमानफेऱ्यांना विलंब दिसून आला. हवेली तालुक्यामध्ये थेऊर गावात ओढ्याला पूर आल्याने अडकलेल्या दीडशे जणांना वाघोली अग्निशमन दल आणि पीडीआरएफच्या पथकांनी सुरक्षितपणे...

September 7, 2025 11:30 AM

views 38

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

September 6, 2025 3:00 PM

views 21

 पंजाबमध्ये राज्यातल्या नद्यांच्या पुराचा प्रकोप कमी

पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २२ जिल्ह्यातली १ हजार ९४८ गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे ३ लाख ८४ हजार लोक बाधित झाले आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. भाक्रा धरणातून आता अतिरिक्त विसर्ग होणार नसल्यामुळे भीतीचं कारण नाही असं भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळानं सांगितलं आहे.  तसंच दोन आंतरमंत्रीय केंद्रीय पथकांनी पुरामुळे झालेल्य...

August 29, 2025 3:35 PM

views 33

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

   राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं असून, प्रशासनानं गाव पातळीवर पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   कोल्हापुरातही राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग आज वाढवला, आज दुपारी धरणाचा अणखीन एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. लातूरमध्ये अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.   नांदेडमध्ये विष्णूपुरी धरण प्रकल...

August 25, 2025 3:12 PM

views 6

पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुजरात, ओदिशा, राजस्थान आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.   अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, उत्तर प्रदेश, झारखंड, कोकण आणि गोवा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी आज मुसळधार...

August 25, 2025 10:46 AM

views 42

हिमाचलप्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.   अनेक भागातील वीजपुरवठाही प्रभावित झाला आहे, 941 जनित्र आणि 95 पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. हवामान खात्याने या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्...

August 21, 2025 3:23 PM

views 38

राज्याच्या विविध भागात पूरस्थिती

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.    लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.   सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे गुर...

August 18, 2025 8:33 PM

views 9

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा ...