March 5, 2025 1:31 PM

views 28

दिल्ली रेल्वे विभागातल्या ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दिल्ली विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारीला झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुष्पेश आर त्रिपाठी हे उत्तर रेल्वे विभागाचे नवे रेल्वे व्यवस्थापक असणार आहेत.

March 1, 2025 1:47 PM

views 34

रेल्वेमंत्र्यांनी केली अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पाहणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अहमदाबाद रेल्वे स्थानकाला भेट देऊन तिथं सुरु असलेल्या पुनर्विकास कामाची पाहणी केली. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केला जात असून येत्या तीन - साडे तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. गुजरातच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, गुजरातमध्ये लवकरच रेल्वे मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण होईल, असं ते म्हणाले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात गुजरातसाठी १७ हजार १५५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे, अस...

January 2, 2025 2:38 PM

views 26

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या ४३ गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या गाडीची सद्यःस्थिती तपासूनच स्थानकावर जावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

December 27, 2024 10:45 AM

views 28

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   बीडपासून काही अंतरावर असलेल्या राजुरीपर्यंत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून राजूरीपर्यंतच्या या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार-मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा ते सा...

November 25, 2024 2:26 PM

views 21

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. २००४ ते २०१४ या १० वर्षात रेल्वेमधे ४ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली ...

August 9, 2024 3:54 PM

views 18

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

August 7, 2024 8:18 PM

views 22

१०,००० रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारची मंजुरी

दहा हजार रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ‘कवच’ मुळे ट्रेनचा वेग नियंत्रित होणार असून अपघात रोखण्यासाठी आवश्यकता असेल तिथे ब्रेक लावणं शक्य होणार आहे. पुढल्या दोन वर्षात कवच लावण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. देशभरात कवच बसवण्याचं काम वेगात सुरू असून

July 23, 2024 8:20 PM

views 25

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वेच्या एकूण अर्थसंकल्पातल्या १ लाख ८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद सुरक्षे संबंधित कामांसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

July 3, 2024 9:21 AM

views 26

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे, यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.