September 15, 2025 9:02 PM September 15, 2025 9:02 PM
20
रेल्वे तिकिटाच्या आरक्षणासंदर्भात नवा नियम!
येत्या १ ऑक्टोबरपासून रेल्वेच्या तिकिटाचं आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटात केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकीट आरक्षण करता येणार आहे. IRCTCची वेबसाइट आणि APP वरच नागरिकांना ही तिकिट आरक्षित करता येतील. सध्या हे निर्बंध केवळ तत्काळ बुकींगसाठी लागू आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी सर्वसाधारण तिकीटांच्या आरक्षणासाठीही हे निर्बंध लागू होतील. तिकिट खिडकीवर होणाऱ्या तिकीट आरक्षणाच्या वेळेत मात्र कुठलाही बदल होणार नाही.