June 11, 2025 8:34 PM June 11, 2025 8:34 PM

views 8

रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी ओटीपी नोंदवणं बंधनकारक

येत्या १५ जुलैपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. IRCTC अॅप किंवा IRCTC वेबसाइटवरुन तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांचा आधार संलग्न ओटीपीची नोंद करणे आवश्यक असेल. रेल्वेने आज यासंदर्भातलं पत्रक प्रसिद्ध केलं. याशिवाय ज्या खात्यावरुन तत्काळ तिकीट आरक्षित केले जाणार आहे ते खाते देखील आधार संलग्न असणे आवश्यक असेल. याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे.   तिकीट खिडकी किंवा रेल्वेच्या अधिकृत एजंटकडून तत्काळ तिकीट आरक्षित करता...