October 18, 2024 8:50 AM October 18, 2024 8:50 AM

views 1

रेल्वेचं आगाऊ आरक्षण १२० ऐवजी ६० दिवसाआधी करता येणार

रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.