July 25, 2025 9:02 PM July 25, 2025 9:02 PM

views 8

नाशिकमधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेमंत्र्यांचा आढावा

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठीच्या रेल्वेच्या योजनांचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आढावा घेतला. प्रयागराज इथं झालेल्या महाकुंभच्या अनुभवावरून लगतच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याची सूचना वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना  केली.   अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नाशिक परिसरातल्या नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख स्थानकांवरून प्रवासी वाहतुकीचं व्यवस्थापन केलं जाईल. यासाठी या स्थानकांवरच्या प्रस्तावित कामांचा ...

May 3, 2025 3:02 PM May 3, 2025 3:02 PM

views 6

रेल्वेमंत्र्यांनी बीकेसी इथल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाची केली पाहणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

March 7, 2025 9:03 PM March 7, 2025 9:03 PM

views 4

६० रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश मिळणार

देशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे.    देशभरातल्या ६० स्थानकांवर प्रवेशाचं संपूर्ण नियंत्रण ...

November 16, 2024 8:18 PM November 16, 2024 8:18 PM

views 17

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची आणि मेट्रो मध्ये १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्यातल्या १३२ स्टेशनचा अमृत भारत अंतर्गत विकास सुरू आहे. मुंबईत ३२० किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग टाकले जात आहेत. त्यासाठी १६ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होत आहे. याशिवाय मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी Indian Institute of Creative Technology ची स्थापना करायल...

August 7, 2024 8:18 PM August 7, 2024 8:18 PM

views 7

१०,००० रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारची मंजुरी

दहा हजार रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ‘कवच’ मुळे ट्रेनचा वेग नियंत्रित होणार असून अपघात रोखण्यासाठी आवश्यकता असेल तिथे ब्रेक लावणं शक्य होणार आहे. पुढल्या दोन वर्षात कवच लावण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. देशभरात कवच बसवण्याचं काम वेगात सुरू असून

August 1, 2024 3:15 PM August 1, 2024 3:15 PM

views 12

रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. सभागृहात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणी संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजा...