December 5, 2025 8:07 PM

views 18

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध-रेल्वेमंत्री

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, सर्वसमावेशक स्थानकं पुनर्विकास प्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रेल्वेचा चांगला विकास झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. २००९ ते २०१४ या कालावधीत रेल्वेनं राज्यातल्या पायाभूत सुविधांसाठी १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद केली होती, २०२५-२६पर्यंत त्यात २० पट वाढ होऊन ही...

August 3, 2025 8:04 PM

views 8

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होणार – रेल्वे मंत्री

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून लौकरच या दोन शहरातलं अंतर केवळ २ तास ७ मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रिवा कडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. गेल्या अकरा वर्षात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ...

July 25, 2025 9:04 PM

views 14

मुंबई शहरी प्रवास प्रकल्पाच्या तीन टप्प्यांना रेल्वे मंत्रालयाची मान्यता

मुंबई उपनगरी भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि भविष्यात प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ५२ हजार ७२४ कोटी रुपये खर्चाच्या मुंबई शहरी प्रवास प्रकल्पाच्या तीन टप्प्यांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. यात पहिल्या टप्प्यासाठी ८ हजार ८७ कोटी, दुसऱ्या टप्प्यासाठी १० हजार ९४७ कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ हजार ६९० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आल्याचं लेखी उत्तरात म्हटलं आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत राज्यातल्या १३२ र...

July 17, 2025 1:48 PM

views 22

देशातल्या दहा लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची अश्विनी वैष्णव यांची घोषणा

देशातील दहा लाख नागरिकांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते नवी दिल्ली इथं ‘सामान्य सेवा दिवस - डिजिटल भारताची दहा वर्षे’ या कार्यक्रमात बोलत होते. या  प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्तरावरच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.        युपीआय पेमेंटची संख्या व्हिसाच्या पेमेंटहून जास्त झाल्याचं सांगत डिजिटल भारत ही संकल्पना आणि त्याचे लाभ घराघरापर्य...

June 20, 2025 2:22 PM

views 15

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाच्या परिवहन मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाचे परिवहन मंत्री सलेह अल जास्सर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी विचारविमर्श केला. रशियात सेंट पीटर्सबर्ग इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी सध्या अश्विनी वैष्णव रशियाच्या दौऱ्यावर आहेत. वैष्णव यांनी काल रशियाचे उपप्रधानमंत्री एलेक्सी ओवरचुक यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भारत आणि रशिया दरम्यान मुख्यतः परिवहन, संपर्क यंत्रणा, प...

February 16, 2025 3:43 PM

views 16

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याऐवजी सरकार आकडे लपवण्यात गुंतलं होतं असा आरोप त्यांनी केला. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता असं त्या म्हणाल्या.  

February 3, 2025 9:03 PM

views 14

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २३८०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार या प्रकल्पांमधला राज्याचा वाटा रिझर्व्ह बँक उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातली नवी १३२ स्थानकं विकसित के...

August 9, 2024 3:54 PM

views 11

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

August 2, 2024 7:14 PM

views 18

देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असून त्यापैकी ३२० किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितलं. ही बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार असून हा प्रकल्प जपानच्या सहयोगानं सुरु आहे.