August 10, 2024 8:28 PM August 10, 2024 8:28 PM
10
जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी ७ हजार १६० कोटी रुपये खर्च येणार असून, येत्या ४ ते ५ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. कैलास, वेरुळ, अजिंठा या जागतिक वारसा ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा रेल्वेमार्ग सोयीचा ठरेल असं त्या म्हणाल्या.