January 31, 2025 8:14 PM January 31, 2025 8:14 PM
17
मुंबई रेल्वे बाॅम्बस्फोट : राज्यसरकारच्या याचिकेवरचा निर्णय उच्च न्यायालयाकडू राखून
मुंबईत जुलै २००६ मधे झालेल्या रेल्वे बाँबस्फोट प्रकरणी १२ आरोपींना ठोठावलेली फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी राज्यसरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. २०१५ मधे कनिष्ठ न्यायालयानं या १२ आरोपींना दोषी ठरवलं, आणि त्यापैकी ५ जणांना फाशी, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षी सुनावली होती.