January 22, 2025 8:32 PM January 22, 2025 8:32 PM
8
जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू, १४ जखमी
जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. या मार्गावरुन मुंबईकडे चाललेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली आणि डब्यातून खाली उतरले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडल्यानं हा अप...