January 23, 2025 2:31 PM January 23, 2025 2:31 PM
12
जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यु
महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे. शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि ते भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन,आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाट...