April 12, 2025 5:22 PM April 12, 2025 5:22 PM

views 13

कॅटमरान प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी मंत्री नितेश राणे यांचे चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्राजवळ कॅटमरान प्रवासी बोटीच्या काल झालेल्या घटने प्रकरणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने यासाठी त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून तीन दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. अजंठा कंपनीच्या या बोटीची सर्व प्रमाणपत्र निलंबित करत पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घातले आहेत. गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा येथे 130 प्रवाशांना घे...

December 20, 2024 8:07 PM December 20, 2024 8:07 PM

views 14

रायगड अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचं अर्थसहाय्य करणार अस...