November 17, 2025 6:22 PM November 17, 2025 6:22 PM

views 14

रायगडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला भूमीपुत्रांचा विरोध

रायगड जिल्हात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला स्थानिक आणि भूमीपूत्र तीव्र विरोध करत आहेत. या योजने अंतर्गत  धेरंड - शहापूर परिसरात सुमारे ३८७ हेक्टर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सिनारमास कंपनीच्या प्रकल्पाचं सीमांकन आणि तिथवर जाणाऱ्या रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज जोरदार निदर्शनं  केली. आधी आपल्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

September 9, 2025 3:37 PM September 9, 2025 3:37 PM

views 13

रायगड जिल्ह्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात स्फोट

रायगड जिल्ह्यात उरण इथल्या ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात काल स्फोट होऊन परिसरातल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.    गॅस पाईपलाईन गरम झाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज असून स्फोटानंतर आगीचे लोट पसरले होते. परिसरातल्या घरांना हादरे बसले, काचा, तावदाने फुटली.. मात्र सुदैवानं जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही..

June 11, 2025 3:35 PM June 11, 2025 3:35 PM

views 14

रायगडमध्ये ऑरिक औद्योगिक वसाहतीत इटालियन कंपन्यांसाठी विशेष सुविधा निर्माण होणार

भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी “होम अवे फ्रॉम होम” या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यात या वसाहतींसाठी रायगडमधलं दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे.   छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीचा विस्तार सुमारे आठ हजार एकरांपर्यंत करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून, या विस्तारीकरणात इटालियन कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टरची रचना केली जाणार आहे. &...

January 21, 2025 8:49 AM January 21, 2025 8:49 AM

views 12

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये कुठलेही वाद नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

December 11, 2024 3:52 PM December 11, 2024 3:52 PM

views 9

शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी

शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आस्वाद पटेल हे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी मंंत्री दिवंगत मिनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत. आस्वाद पाटील यांच्यासोबत पक्षाचे अनेक कार्यकर्ते बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना शेकापकडून उमेदवारीची इच्छा होती, मात्र पक्षाने चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज होते असं आता सांगितलं जात आहे.

October 4, 2024 9:25 AM October 4, 2024 9:25 AM

views 23

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासंदर्भात युनेस्कोच्या शिष्टमंडळाची रायगडाला भेट

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या पथकानं कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार माहिती घेत...

September 12, 2024 3:17 PM September 12, 2024 3:17 PM

views 12

रायगड जिल्ह्यात रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहाेचला. यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं. घटनास्थळी अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

July 30, 2024 3:34 PM July 30, 2024 3:34 PM

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.   कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.   सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे. &...

July 19, 2024 5:14 PM July 19, 2024 5:14 PM

views 13

रायगड : कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदार हिचा रील्स करताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला; या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.   पोलीस प्रशासनानं धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी (स्टंटबाजी) करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

July 17, 2024 3:21 PM July 17, 2024 3:21 PM

views 9

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१ कोटी ६१ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.