July 19, 2025 6:16 PM July 19, 2025 6:16 PM

views 39

काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे, दहाजणं ताब्यात

जम्मू-काश्मिर पोलिसांच्या गुप्तचर विभागानं काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे टाकले आणि १० जणांना ताब्यात घेतलं. हे सर्वजण इनक्रिप्टेटेड मेसेजिंग अॅपचा वापर करुन संदेशांची देवाणघेवाण करत होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महम्मद आणि लष्कर - ए- तयब्बाच्या दहशतवाद्यांशी त्यांचा संपर्क होता, असाही संशय आहे. यावेळी काही कागदपत्र आणि उपकरणंही ताब्यात घेण्यात आली. 

December 7, 2024 1:35 PM December 7, 2024 1:35 PM

views 13

सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डेबिट व्यवहारांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं आढळलं आहे. तसचं विविध डमी संस्थांच्या खात्यातून शेकडो कोटी रुपयांची रोकड काढून ती अहमदाबाद, मुंबई आणि सुरत इथं हवाला ऑपरेटर्सना वाटण्यात आली. नोव्हेंबरमध्ये नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगा...