July 2, 2025 3:14 PM July 2, 2025 3:14 PM

views 12

शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतः जोताला जोडण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न याविषयावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. या गंभीर स्थितीवर आताच चर्चा करण्याची मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली. सरकार ही चर्चेला तयार आहे, आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दिलं. मात्र याचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

March 11, 2025 2:40 PM March 11, 2025 2:40 PM

views 6

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना समाजमाध्यमावरच्या संदेशात अभिवादन केलं आहे. 

July 21, 2024 6:43 PM July 21, 2024 6:43 PM

views 13

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. मदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग...