August 7, 2024 3:45 PM August 7, 2024 3:45 PM

views 14

वायनाडमध्ये दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. सभागृहात शून्य प्रहरादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई वाढवून देण्याचीही मागणी केली. अशा प्रकारच्या आपत्तीचा सामना करू शकेल अशा पायाभूत सुविधांसह वायनाडसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन निधी जाहीर करावा, असं राहुल गांधी म्हणाले. वायनाडमध्ये केंद्र आणि राज्यांची सरकारं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्क...

July 29, 2024 8:35 PM July 29, 2024 8:35 PM

views 15

राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं – मंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन, त्यांना राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. राहुल गांधी लोकसभेच्या सभापतींना सातत्यानं प्रश्न विचारत राहिले त्यांचं हे वर्तन निषेधार्ह असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.

July 29, 2024 7:04 PM July 29, 2024 7:04 PM

views 15

जातीआधारित जनगणना करण्याची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी

जातीआधारित जनगणना करावी आणि किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. इंडिया आघाडीचं सरकार आल्यास या दोन्ही गोष्टी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या लोकसंख्येच्या ७३ टक्के असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी काहीच तरतुदी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी, केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद सातत्यानं कमी क...

July 23, 2024 3:22 PM July 23, 2024 3:22 PM

views 12

अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा नाही – राहुल गांधी

सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागचे अर्थसंकल्प यांची नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.   सरकारला पाठिंबा देणाऱ्या राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून देण्यात आलं मात्र देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या राज्याला अर्थसंकल्पात दुय्यम वागणूक दिल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

July 5, 2024 7:19 PM July 5, 2024 7:19 PM

views 19

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांच्या घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हाथरस दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यातले बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावं, अशी मागणी गांधी यांनी राज्यसरकारकडे केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपला अहवाल आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केला. सुमारे १०० संबंधितांच्या जबान्या नोंदवून हा १५ पानी अहवाल तपास पथकाने तयार केला आहे.

June 25, 2024 7:12 PM June 25, 2024 7:12 PM

views 32

नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक

राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात आज बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्यातल्या कामगिरीविषयी खर्गे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि मतदारांचे आभार मानले.

June 17, 2024 8:34 PM June 17, 2024 8:34 PM

views 14

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली.    राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असं खरगे यांनी जाहीर केलं.