September 26, 2024 8:34 PM September 26, 2024 8:34 PM

views 10

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

हरियाणामधल्या तरुणांसमोर बेरोजगारीचं आव्हान उभं राहिलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाल जिल्ह्यातल्या आसंध मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत आज ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, तसंच महिलांना दोन हजार रुपये पेन्शन दिली जाईल, असं आश्वासन गांधी यांनी दिलं. या सभेत हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान...

September 19, 2024 7:49 PM September 19, 2024 7:49 PM

views 9

राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलन केलं. मुंबईत मीरा भाईंदर इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्यांना भाजपाने आवर घालावा तसंच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं निलंबन करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.  कुलाबा इथं विधानसभा अध्यक्ष राहुल ना...

September 17, 2024 6:34 PM September 17, 2024 6:34 PM

views 10

राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  गायकवाड यांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त करत कॉंग्रेसनं बुलडाणा शहरात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   

September 13, 2024 7:31 PM September 13, 2024 7:31 PM

views 18

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

लोकसभतले विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या  आरक्षणा संदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.     हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे , माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं.   नंदूरबार जिल्ह्यात नगरपालिका चौकात माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्त्वाखाली राहूल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. या वेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ...

September 12, 2024 6:48 PM September 12, 2024 6:48 PM

views 15

राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या भाजपाचं राज्यभर आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे.   भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत. ठाण्यात रवींद्र चव्हाण, जळगावात गिरीश महाजन, पुण्यात चंद्रकांत पाटील, चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.    याशिवाय अहिल्यादेवीनगरमध्ये राम शिंदे, नाशिकला देवयानी फरांदे, सीमा हिरे, नागपूरमध्ये विक्रांत पाटील, नंदुरबारमध्ये...

September 11, 2024 8:02 PM September 11, 2024 8:02 PM

views 11

राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत आहे – नाना पटोले

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे. 

September 11, 2024 6:12 PM September 11, 2024 6:12 PM

views 20

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भारतात शिख समुुदायाला त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाचं पालन करू दिलं जात नाही या गांधी यांचा आरोप तथ्यहीन आणि सत्यापासून कोसो दूर असल्याचंही सिंह म्हणाले.

September 5, 2024 3:18 PM September 5, 2024 3:18 PM

views 10

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जून खरगे, महाविकास आघाडीेचे ज्येष्ठ नेते शरद पवार तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि इतर ज्येष्ठ नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं ...

August 21, 2024 7:39 PM August 21, 2024 7:39 PM

views 17

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय – राहुल गांधी

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.  पश्चिम बंगाल, युपी, बिहारनंतर महाराष्ट्रातील मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.  अल्पवयीन मुलींवर झालेल्या अन्यायाला दाद मिळवण्यासाठी  जनआंदोलन उभारावं लागलं. एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन का करावं लागतं, असा प्रश्न ही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर महिलांना सुरक्षित वाताव...

August 17, 2024 10:12 AM August 17, 2024 10:12 AM

views 13

घटकपक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास आपला पाठिंबा – उद्धव ठाकरे

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.