November 11, 2024 7:44 PM November 11, 2024 7:44 PM
13
राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जु...