April 16, 2025 3:40 PM April 16, 2025 3:40 PM
8
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा काँग्रेसचा आरोप
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असूनची काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून, त्यावर राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही, असं भाजप खासदार...