October 18, 2024 8:53 AM October 18, 2024 8:53 AM
9
भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड- देवळा विधानसभा मतदार संघातले भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात उमेदवारीसाठी आपले चुलतबंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस डॉ आहेर यांनी पक्षाकडे केली आहे. भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता.