October 29, 2025 12:58 PM October 29, 2025 12:58 PM

views 33

राफेल लढाऊ विमानातून राष्ट्रपतींचं उड्डाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं. अंबाला इथल्या हवाईदल तळावरुन त्यांनी राफेलमधून आकाशात झेप घेतली. . याआधी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधल्या तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं.

April 10, 2025 10:35 AM April 10, 2025 10:35 AM

views 9

भारत फ्रान्सकडून २६ राफेल विमानं खरेदी करणार

भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार आहे. या २६ राफेल विमानांपैकी २२ विमानं एक आसनी आणि चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे.   राफेल सागरी विमानांमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार असून ,ही लढाऊ विमानं नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि त्यासारख्या विमानवाहू नौकांवर तैनात केली जाणार आहेत. राफेल विमानांमध्ये प्रगत शस्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्र असतील.