March 31, 2025 8:47 PM March 31, 2025 8:47 PM

views 11

शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे रोजगारात वाढ होणार-राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सावळीविहीर खुर्द इथल्या शिर्डी औद्योगिक वसाहत इथं डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.    एमआयडीसीने डिफेन्स क्लस्टरसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी टाटा कंपनीच्या पुढाकाराने अडीचशे कोटींचे...

January 6, 2025 8:23 PM January 6, 2025 8:23 PM

views 17

जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समिती बैठक

कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन लाभक्षेत्रातल्या जमिनीला देण्याचा निर्णय आज अहिल्यानगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असं सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागानं करावं, पीक पाहणी नुसार नियोजन करावं, प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणीपीकाची नोंद नसेल पाणी नाही ही भूमिका घ्यावी लागेल, अशा सूचना विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

August 31, 2024 6:07 PM August 31, 2024 6:07 PM

views 12

अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं आयोजन

कृषी उत्पादन वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं असं राज्याचे महसूल पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं कृषी खात्याने आयोजित केलेल्या शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला कृषीमालाच्या विक्रीसाठी शिर्डीत विक्रीकेंद्र सुरु करता येईल असं ते म्हणाले. कृषी महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत  कृषी तंत्रज्ञान पोचवायला हवं असं त्यांनी सांगितलं. ...

August 28, 2024 3:44 PM August 28, 2024 3:44 PM

views 11

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामं झालेली नाहीत त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी आणि थांबलेलं काम पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा अधिक संस्था नियुक्त करून तातडीने महामार्गाची दुरुस्ती करावी असे निर्देश विखे पाटील यांनी दिल आहेत.

July 19, 2024 3:14 PM July 19, 2024 3:14 PM

views 7

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा- राधाकृष्‍ण विखे पाटील

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा, अशी मागणी दुग्ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. दूध दरातल्या चढ-उताराचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं दूध उत्‍पादकांना दिलासा देण्यासाठी तातडीनं हा निर्णय घ्यावा,अशी विनंती त्यांनी केली आहे.

July 18, 2024 11:59 AM July 18, 2024 11:59 AM

views 11

राज्‍यात दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावे-राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातल्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केलं, तर राज्‍यातल्या दूध उत्‍पादकांना ३५ रुपये दर देणं शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

July 17, 2024 3:51 PM July 17, 2024 3:51 PM

views 8

दूध प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातला अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समुह तसंच इतर प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं असं आवाहन, दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केलं तर राज्‍यातल्या दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणं शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

July 11, 2024 7:58 PM July 11, 2024 7:58 PM

views 10

भटके विमुक्त समाजाला महीनाभरात दाखले द्या – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांना महिन्याभरात दाखल्यांचं वाटप करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात विधानभवनात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.