November 29, 2025 7:00 PM November 29, 2025 7:00 PM
39
केवळ सव्वा ३ लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा
रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळं...