September 16, 2025 8:55 PM September 16, 2025 8:55 PM

views 3

यंदाच्या रब्बी हंगामात देशात ३६२ दशलक्ष टनांहून अधिक अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य

यंदाच्या रब्बी हंगामात ३६२ पूर्णांक ५० शतांश दशलक्ष टन अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असल्याची घोषणा  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्ली इथं केली.  विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत पार पडलेल्या  रब्बी अभियान परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यंदाचं अन्न धान्य उत्पादनाचं लक्ष्य गेल्या वर्षी झालेल्या अन्न धान्य उत्पादनापेक्षा २ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी जास्त असल्याचं चौहान यांनी यावेळी अधोरेखित केलं. या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्...