July 16, 2024 8:04 PM July 16, 2024 8:04 PM

views 13

बांगलादेशात कोटा सुधारणेविरोधात झालेल्या निदर्शनांत ३ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी

बांगलादेशात ढाक्यासह विविध शहरांमध्ये आज कोटा सुधारणा आंदोलनाविरोधात झालेल्या निदर्शनांत तीन जण ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. चट्टोग्राममध्ये कोटा सुधारणा आंदोलक आणि बांगलादेश छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले. तसंच रंगपूर विद्यापीठाच्या आवारात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चट्टोग्राम, रंगपूर, राजशाही आणि बांगलादेशातल्या इतर शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध महामार्गांसह रस्ते रोखल्यानं ढाक्यामधली वाहतूक आ...