July 30, 2024 9:32 AM July 30, 2024 9:32 AM

views 17

दहशतवाद्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा क्वाड गटातील परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

दहशतवाद्यांकडून सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा इशारा क्वाड गटातील चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. त्याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील दहशतवादी संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.   लष्कर- ए-तैयबा, जैश-ए महंमद तसंच अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या संघटनांचा त्यामध्ये समावेश आहे. दहशतवाद पसरवण्याच्या हेतूनं करण्यात येणाऱ्या नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आण...

July 26, 2024 10:48 AM July 26, 2024 10:48 AM

views 8

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी वॉशिंग्टनमधे पत्रकारांशी बोलताना दिली.   अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांनी माघार घेतली असल्यानं ते आता अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यात ते आधी उपस्थित राहणार नव्हते असं किर्बी यांनी सांगितलं. क्वाड परिषदेचं यजमानपद यावर्षी भारत भूषवणार आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेर...