September 21, 2024 7:59 PM September 21, 2024 7:59 PM

views 14

क्वाड नेत्यांच्या वार्षिक परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत. कर्करोग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी नाविन्यपूर्ण धोरणाची सुरुवात या परिषदेत होणार आहे.  यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.  अमेरिकेतल्या या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उच...