November 16, 2025 8:03 PM November 16, 2025 8:03 PM

views 8

मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी तसंच इतर जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक यासह धोरणात्मक विषयावर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाधमाध्यमावरल्या पोस्टमधे सांगितलं. जयशंकर यांनी थानी यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधले परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी भारत वचनबद्ध असल्याचं सांगितलं.

February 19, 2025 9:22 AM February 19, 2025 9:22 AM

views 24

भारत आणि कतार यांच्यात लवकरच मुक्त व्यापार करार

भारताचे कतारशी असलेले संबंध अनेक शतकं जूने असून, कतार, पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. भारताच्या दौऱ्यावर असलेले कतारचे आमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या विशेष भोजन समारंभात त्या बोलत होत्या.   दरम्यान, प्रधानमंत्र नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात काल नवी दिल्लीत चर्चा झाली. चर्चेदरम्यान, भारत आणि कतार यांच्यातला व्या...

February 18, 2025 8:10 PM February 18, 2025 8:10 PM

views 6

भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार

भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करुन २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. त्यासाठी लवकरच मुक्त व्यापार करार केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी धोरणात्मक भागिदारी आणि दुहेरी करनिर्धारण टाळण्यासाठीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. तसंच आर्थिक भागिदारी वाढवणं, पुराभिलेखांचं व्यवस्थापन, क्रीडा आणि युवक व्यवहार क्षेत्रातले संबंध मजबूत करण्यासाठ...

February 18, 2025 12:52 PM February 18, 2025 12:52 PM

views 16

भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचं उद्घाटन

भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कतारचे वाणिज्यमंत्री शेख फैज़ल बिन थानी अल थानी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी भारत – कतार दरम्यान दोन समझोता करार झाले.

February 18, 2025 1:16 PM February 18, 2025 1:16 PM

views 9

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करत आहेत. शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. शेख तमीम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रपती भवनात पाहुण्याना पारंपरिक मानवंदना देण्यात आली.    शेख तमीम यांच्यासोबत उच्चपदस्थ शिष्टमंडळ आलं असून व्यापार, गुंतवणूक, उर्जा, आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबद्दल या ...