June 8, 2025 6:51 PM June 8, 2025 6:51 PM

views 6

प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरचा ताण कमी होत असल्यामुळे, संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आंबी-तरंगवाडी इथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते.  त्यादृष्टीनं राज्यातल्या आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, असं त्यांनी  नमूद केलं.