November 8, 2024 8:31 PM November 8, 2024 8:31 PM
1
मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं होणाऱ्या पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन झालं. ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी संस्कृतीच्या, कलाकुसरीच्या तसंच खाद्य पदार्थांच्या जिनसा प्रदर्शित केल्या जाणार असून त्या माध्यमातून या समाजाची संस्कृती जोपासण्याचा तसंच त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रदर्शनात विविध १३ राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवासीं समाजाच्या वेगवान ...