September 15, 2025 8:24 PM September 15, 2025 8:24 PM

views 3

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन

बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमधल्या पूर्णिया इथं पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं,  त्यावेळी ते बोलत होते.  राजद आणि काँग्रेसच्या कुशासनामुळे लोकांनी त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं अशी टीका प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. जीएसटी सुधारणांचा उल्लेखही त्यांनी केला. नव्या कररचनेमुळे साबण, पेस्ट, किराणा, कपडे अशा दैनंदिन उपयोगाच...