September 6, 2025 3:00 PM September 6, 2025 3:00 PM
19
पंजाबमध्ये राज्यातल्या नद्यांच्या पुराचा प्रकोप कमी
पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २२ जिल्ह्यातली १ हजार ९४८ गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे ३ लाख ८४ हजार लोक बाधित झाले आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. भाक्रा धरणातून आता अतिरिक्त विसर्ग होणार नसल्यामुळे भीतीचं कारण नाही असं भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळानं सांगितलं आहे. तसंच दोन आंतरमंत्रीय केंद्रीय पथकांनी पुरामुळे झालेल्य...