November 3, 2024 6:28 PM November 3, 2024 6:28 PM

views 8

पंजाबमध्ये या वर्षभरात आतापर्यंत एक हजार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त

पंजाबमध्ये या वर्षभरात आतापर्यंत एक हजार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलीस या दोघांनीही केलेल्या कारवाईअंतर्गत अंमली पदार्थांचा हा प्रचंड साठा जप्त केला आहे आणि पंजाब पोलिसांनी सीमेवर आणि त्या लगतच्या परिसरात दहा हजारांहून अधिक अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे.    सीमा सुरक्षा दलानं पंजाबमध्ये भारतीय हद्दीत हेरॉईन आणि शस्त्रास्त्रं घेऊन जाणारे १८५ ड्रोन रोखले किंवा पाडले आहेत, असं...

June 26, 2024 10:56 AM June 26, 2024 10:56 AM

views 9

हरजीतसिंग आणि कुलबीर सिंग या २ आरोपींच्या शोधासाठी १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

पंजाबमधील नांगल इथल्या विकास प्रभाकर या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास संस्थेनं प्रत्येकी 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही हत्या केल्याचा संशय असलेले हरजीतसिंग उर्फ लड्डी आणि कुलबीर सिंग उर्फ सिधु हे दोन आरोपी 9 मे पासून फरार आहेत. त्यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.