May 13, 2025 7:46 PM May 13, 2025 7:46 PM

views 11

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ झाली आहे. अमृतसरच्या मजीठा भागातल्या चार गावातल्या नागरिकांनी काल रात्री इथेनॉल मिश्रीत दारू प्यायली होती. याप्रकरणी दहा जणांना अटक केलं असून दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक पोलिस उपअधिक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.    या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी भेट घेत दोषींची गय केली जाणार नाही असं आश्वासन दिलं. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि कु...

April 30, 2025 1:17 PM April 30, 2025 1:17 PM

views 15

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा पंजाबचा आरोप

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केला आहे. पंजाबमध्ये पाणीसाठा कमी असूनही माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हरयाणाला आधीच ४ हजार क्युसेक पाणी दिलं आहे. मात्र, आता आपल्या राज्यात इतर राज्यांना देण्यासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं मान एका निवेदनाद्वारे म्हणाले. केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मान यांच्यावर टीका केली आहे. एकिकडे देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत असताना मान यांनी हरयाणा...

April 23, 2025 8:19 PM April 23, 2025 8:19 PM

views 21

पंजाबने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बाजूची सीमा केली बंद

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.   मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्याच्या सीमा पाकिस्तानला आणि काश्मीरला लागून असल्यामुळे राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

April 6, 2025 6:47 PM April 6, 2025 6:47 PM

views 15

पंजाबमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांची उपोषण संपवल्याची घोषणा

पंजाबमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांनी आज फतेहगढ साहिब इथे आपलं उपोषण संपवल्याची घोषणा केली. उपोषण संपलं असलं तरी आपण शेतकरी चळवळीचं नेतृत्व नव्या ताकदीने करत राहू, असं ते म्हणाले आहेत. सिंग हे नोव्हेंबर २०२४पासून उपोषण करत होते. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं होतं.

March 14, 2025 6:51 PM March 14, 2025 6:51 PM

views 15

पंजाबमधील एका शिवसेना नेत्याची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या

पंजाबमधील एका शिवसेना नेत्याची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगत राय उर्फ मंगा असे त्यांचे नाव असून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मोगा जिल्हा अध्यक्ष होते.    मंगा हे गुरुवारी रात्री घराबाहेर पडले असता त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मात्र, ती गोळी चुकून एका १२ वर्षांच्या मुलाला लागली. त्यानंतर मंगा हे गाडीवरून पळून गेले. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून पुन्हा त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी झालेल्या मंगा आणि मुला...

March 11, 2025 9:53 AM March 11, 2025 9:53 AM

views 16

राष्ट्रपती आज पंजाबमधील एम्स च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पंजाबमधील भटिंडा इथं सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार आहेत.   संध्याकाळी पंजाब सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ मोहाली इथं आयोजित केलेल्या एका नागरी स्वागत समारंभात सहभागी होतील. उद्या त्या चंदीगड इथं पंजाब विद्यापीठाच्या 72 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलब...

March 1, 2025 8:08 PM March 1, 2025 8:08 PM

views 15

पंजाबला अंमलीपदार्थमुक्त बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमलीपदार्थमुक्त बनवण्याचा संकल्प पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी केला आहे. या कालावधीत पंजाबमधून सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचं उच्चाटन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिले. या सर्व मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी ५ मंत्र्यांची समितीही त्यांनी स्थापन केली आहे.    पंजाब पोलिसांच्या ८ हजार कर्मचाऱ्यांनी आज ८०० ठिकाणी छापे टाकले. या कारवाईतून पोलिसांनी २९० अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली ...

February 4, 2025 10:49 AM February 4, 2025 10:49 AM

views 14

महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामराला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कर्नाटकच्या जोनाथन अँथनीने सुवर्णपदक जिंकलं. भारत्तोलन स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्मानं महिलांच्या 87 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत तीन नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. पुरुषांच्या गटात, सेनादलाच्या लवप्रीत सिंगनं एकूण 367 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर उत्तराखंडच्या विवेक पांडेने कास्यपदक पट...

December 27, 2024 7:57 PM December 27, 2024 7:57 PM

views 11

पंजाबमधे भटींडा इथं झालेल्या बस अपघातात ६ जणांचा मृत्यू, तर २६ जण जखमी

पंजाबमधे भटींडा इथं आज एक बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, सहा जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा पोलिसांनी तातडीनं दुर्घटना स्थळी धाव घेतली. आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रवाशांची सुटका केली. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमधे दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  

December 22, 2024 7:45 PM December 22, 2024 7:45 PM

views 9

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू

पंजाबमधल्या मोहाली इथं काल रात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघाताचं बचावकार्य २३ तासांनंतर थांबलं आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला. ढीगऱ्याखाली कोणीही अडकलेलं नसण्याची शक्यता  NDRF च्या जवानांनी व्यक्त केल्यामुळे हे बचाव कार्य आता थांबवण्यात आलंय. मोहालीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल ३ आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.