March 31, 2025 6:45 PM March 31, 2025 6:45 PM

views 7

पंजाबमधे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक

पंजाबमध्ये तरनतारन इथे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १५ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. आरोपी पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहे. त्याचं नाव हर्षप्रीत सिंग असं असून तो अमृतसरचा रहिवासी आहे. पंजाबच्या पाकिस्तान सीमेलगत असलेल्या भागात ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी हर्षप्रीत करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पंजाब सरकारने युद्ध नशेयां विरुद्ध ही मोहीम सुरू केल्यानंतर अंमली पदार्थाची ह...

March 2, 2025 7:44 PM March 2, 2025 7:44 PM

views 5

पंजाबमधल्या जालंदर इथं अल्पकालीन चकमकीनंतर दोन कुख्यात गुंडांना अटक

पंजाबमधल्या जालंदर इथं अल्पकालीन चकमकीनंतर दोन कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांच्या गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी पोलीस या दोन गुंडांच्या शोधात होते. हे दोघेही अमेरिकेतल्या एका टोळीसोबत काम करत असल्याची माहिती पंजाबचे पोलीसप्रमुख गौरव यादव यांनी समाजमाध्यमावर दिली. त्यांच्याकडून दोन अत्याधुनिक शस्त्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत.   तर एका स्वतंत्र कारवाईत फिरोजपूर पोलिसांनी एका अंमली पदार्थ तस्कराला अटक करून त्याच्याकडून...

December 30, 2024 10:47 AM December 30, 2024 10:47 AM

views 7

पंजाब पोलिसांकडून आयएसआय समर्थित नार्को दहशतवादी पद्धतीचा छडा, ५ जणांना अटक

पंजाब पोलिसांनी आयएसआय समर्थित नार्को दहशतवादी पद्धतीचा छडा लावत, त्याच्या म्होरक्यासह पाच जणांना अटक केली आहे. बटाला आणि गुरुदासपूर इथल्या दोन पोलिस आस्थापनांवर हँडग्रेनेड फेकण्यातही या पाच जणांचा सहभाग होता. तसंच बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि अन्य दोन परदेशी हस्तक ही टोळी चालवत होते, अशी माहिती पुनाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी दिली आहे.   या पद्धतीचा छडा लावून पंजाबच्या पोलिसांनी विविध जिल्ह्यांतील पोलिस आस्थापनांवरील हल्ल्याच्या सर्व घटनांची उकल केली आहे, असा दावा त्यांनी केला.