April 9, 2025 10:27 AM April 9, 2025 10:27 AM

views 6

पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी केला पराभव

आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जला २०१ धावा करता आल्या.   दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. आज संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान अहमदाबाद इथं सामना होणार आहे.

April 1, 2025 2:09 PM April 1, 2025 2:09 PM

views 2

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं होणार आहे. काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं १७ षटकात ११६ धावा केल्या. विजयासाठीचं ११७ धावांच हे लक्ष्य मुंबईने दोन गड्याच्या मोबदल्यात केवळ १३व्या षटकातच पूर्ण केलं.