December 3, 2025 1:09 PM December 3, 2025 1:09 PM

views 256

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये थंडीची लाट !

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमधे आज थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर केरळ, माहे, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथंल्या काही भागात जोरदार पाऊस पडेल  असा अंदाज आहे. आंध्रप्रदेशात आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम , त्रिपुरा आणि ओदिशामधे धुक्याची चादर पसरलेली असेल.    दितवाह चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या उत्तर भागात संततधार पाऊस सुरू आहे. 

September 11, 2025 8:13 PM September 11, 2025 8:13 PM

views 20

पंजाबमध्ये फाझिल्का इथे दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक

पंजाबमध्ये फाझिल्का इथे सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक करण्यात आली. या तस्करांकडून २७ पिस्तुलं आणि ४७० जिवंत काडतुसं सापडली आहेत.   हे दोघेही सीमेपार शस्त्रांची तस्करी करत होते. ही शस्त्रं पाकिस्तानमधून एका परदेशी संघटनेमार्फत आणली गेली होती आणि पंजाबमधल्या गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्यात येणार होती, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

September 8, 2025 9:56 AM September 8, 2025 9:56 AM

views 17

पूरग्रस्त पंजाबची पाहणी करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा उद्या दौरा

पंजाबमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक पुरपरिस्थितीचे मूल्यांकन आणि बाधित नागरिकांना त्वरित मदत मिळण्याच्या उद्देशानं ते पाहणी करतील अशी माहिती पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी समाजमाध्यवरील संदेशात दिली आहे. प्रधानमंत्री या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या भागाला नुकतीच भेट दिली. तसंच  या भागाची पाहणी करण्यासाठी दोन ...

September 6, 2025 3:00 PM September 6, 2025 3:00 PM

views 19

 पंजाबमध्ये राज्यातल्या नद्यांच्या पुराचा प्रकोप कमी

पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २२ जिल्ह्यातली १ हजार ९४८ गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे ३ लाख ८४ हजार लोक बाधित झाले आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. भाक्रा धरणातून आता अतिरिक्त विसर्ग होणार नसल्यामुळे भीतीचं कारण नाही असं भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळानं सांगितलं आहे.  तसंच दोन आंतरमंत्रीय केंद्रीय पथकांनी पुरामुळे झालेल्य...

August 27, 2025 6:27 PM August 27, 2025 6:27 PM

views 9

पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण

पंजाबमधे रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं.   सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्रात अडकलेल्यांसाठी सेनादल, बीएसएफ, एनडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची पथकं बचावकार्य करत असून गरज असेल तिथं हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येत्या ३० ऑगस्टपर्यंत स...

June 19, 2025 8:01 PM June 19, 2025 8:01 PM

views 22

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबमधल्या लुधियाना मतदार संधात सुमारे ४९ टक्के, मतदान झालं.  या पाचही मतदारसंधांमधली मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे. 

May 30, 2025 1:13 PM May 30, 2025 1:13 PM

views 13

पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, ३४ जखमी

पंजाबमध्ये, श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातल्या लांबी भागात काल रात्री उशिरा एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण जखमी झाले आहेत. पोलिस उपअधीक्षक जसपाल सिंह यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि ते विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या बचावकार्य थांबवण्यात आलं आहे, बहुतेक कारखान्यातील कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधले स्थलांतरित असल्याचं, आमच्या प्रतिन...

May 19, 2025 8:01 PM May 19, 2025 8:01 PM

views 18

हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब आणि हरयाणातून तीघांना अटक

हेरगिरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत पंजाब पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघं ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्करांच्या हालचाली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधली महत्त्वाची ठिकाणं यांची माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देत होते, असं पोलीसांनी सांगितलं. आरोपींचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल आणि जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.    हरियाणामधल्या नुह जिल्ह्यातही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या...

May 14, 2025 1:05 PM May 14, 2025 1:05 PM

views 18

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. यात दुर्घटनेतल्या १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक रुग्णालयाने दिली आहे. अमृतसरच्या मजिठा इथे काल ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे.

May 14, 2025 12:45 PM May 14, 2025 12:45 PM

views 13

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची घरवापसी

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आज पाकिस्ताननं भारताकडे सुपूर्द केलं. अमृतसरजवळच्या अटारी  संयुक्त चौकीजवळ हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत झाला, असं जालंधर इथल्या आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलं आहे. सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पथकातला हा जवान २३ एप्रिलला चुकून सीमापार क्षेत्रात गेला असता पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं होतं.