July 15, 2024 12:38 PM July 15, 2024 12:38 PM
7
पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण
राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे. राज्यभरात आतापर्यंत २११ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातल्या १० महिलांना झिकाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.