August 24, 2024 7:29 PM

views 16

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे असून ते मुंबईहून हैदराबाद इथं जात होते. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून कमी दृश्यमानतेमुळे की अन्य कारणामुळे हा अपघात झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

August 17, 2024 8:07 PM

views 22

पुण्यातील पुरंदर कंपनीचा अंजिराचा रस पोलंडला निर्यात

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरच्या जीआय मानांकित अंजिरांपासून तयार करण्यात आलेला अंजिराचा रस नुकताच पोलंडला निर्यात करण्यात आला. देशातून निर्यात होणारं पहिलंच हे रेडी टू ड्रिंक पेय आहे. अपेडा अर्थात कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ही निर्यात केली आहे. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने हा रस तयार केला आहे.

August 17, 2024 2:18 PM

views 20

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार २०० कोटी रुपये आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गासाठी २ हजार ९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार, राज्य ...

August 7, 2024 8:37 PM

views 22

पुण्यात एकही झिकाबाधित नाही, सर्व रुग्ण झिकामुक्त

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून झिकाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नसून लागण झालेले सर्व रुग्ण पूर्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. यात २६ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुणे शहरात २० जून रोजी झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता .  त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि  संशयित रुग्णांच्या  रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले .

August 6, 2024 3:57 PM

views 25

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्णांची संख्या ६६ वर

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ६६वर पोहोचली आहे. यामध्ये २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.  गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे.

August 6, 2024 8:47 AM

views 17

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, तसंच...

August 5, 2024 7:23 PM

views 23

पुण्यात झिका विषाणूचे आणखी ७ नवे रुग्ण

पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या पाच गर्भवती महिला, एक १८ वर्षीय तरुण आणि एक ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे.  

August 4, 2024 7:08 PM

views 17

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाला, तर नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार ना...

August 4, 2024 3:07 PM

views 24

पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आज आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवायचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करायचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खडकवासला धरणातला वि...

July 31, 2024 3:29 PM

views 18

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.