September 24, 2024 8:55 AM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत; त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या दौऱ्याच्या अनुषंगाने, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावं; असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

September 22, 2024 3:45 PM

views 19

पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा...

September 22, 2024 10:39 AM

views 25

येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा आरंभ

येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात येतील अशी माहितीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात दिली.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर इथं जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामं करण्यात येतील. मुंबई- बंगळुरू या द्रुतगती महामार्गाचं काम हाती...

September 20, 2024 9:00 AM

views 11

पुण्यात मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पामुळे वृक्षतोड केली जाईल, नदीची वहन क्षमता कमी होईल, पूरस्थिती निर्माण होईल असे आक्षेप घेत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी २०२३ मध्ये ही याचिका दाखल केली होती.

September 16, 2024 1:26 PM

views 24

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.   तसंच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्री आज हिरवा झेंडा दाखवतील. महाराष्ट्रात पुणे-हुबळी आणि कोल्हापूर - पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन दिवस चालणार आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग ते विशाखापट्टणम ही गाडी गुरुवार वगळता आ...

September 8, 2024 6:12 PM

views 21

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

September 5, 2024 3:47 PM

views 24

चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरु होणार

वरीष्ठ पुरुष गटासाठीची चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून महाराष्ट्रात पुणे इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत देशभरातले १८ संघ सहभागी होणार आहेत. टोक्यो ऑलिम्पिक खेळलेले सुरेंदर कुमार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आकाशदीप तसंच ऑलिम्पियन धरमवीर आणि दिलप्रीत सिंग यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

September 4, 2024 9:49 AM

views 16

शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं – राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्यात केलं. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. ज्ञानामध्ये जगात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांच्या गरजा समजून घेऊन विकासात योगदान द्यावं, स्वतःच्या पुढे जाऊन समाजाचा विचार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. दीक्षांत समारंभात 11 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या याबद्दल त्यांनी आनंद...

August 31, 2024 7:35 PM

views 26

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणातील आरोपी असलेलं बियाणी कुटुंबिय पोलिसांना गुंगारा देत होतं. अखेर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अभिषेक बियाणी याला आता बीडला घेऊन जाणार असून ठेवीदारांचे अंदाजे 300 कोटी बुडविल्याच्या तपासाला अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे.

August 25, 2024 6:22 PM

views 27

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी विमानसेवा सुरू

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल.