November 13, 2025 3:14 PM November 13, 2025 3:14 PM

views 36

पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी पवारांना वाचवलं जातंय, दानवेंचा आरोप

पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात गैरव्यवहार उघडकीस येतात मात्र, भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाचवलं जातं, असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून, हे काम अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली केलं असेल, असा आरोपही दानवे यांनी क...