December 15, 2025 7:13 PM December 15, 2025 7:13 PM

views 30

पुण्यात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून लढू, पुण्यात मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिली. पुण्यात त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं.   आपल्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता या निवडणुकीत महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास फडनवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस त्यांच्यासोबत गेली तरीही आपल्याला कोणताही फटका बसणार नाही, मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील, असंही त...

October 8, 2025 7:33 PM October 8, 2025 7:33 PM

views 107

पुणे महापालिकेचा दिवळी बोनस जाहीर!

पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसंच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त ८ पूर्णांक ३३ शतांश टक्के बोनस जाहीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनाबरोबर बोनस दिला जाणार आहे.  विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे.

June 22, 2025 7:13 PM June 22, 2025 7:13 PM

views 12

पुण्यातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी या वाड्यांचं पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वाडे रिकामी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने यंदा ११६ धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावली असून त्यापैकी ७६ वाडे रिकामी करण्यात आले आहेत.