July 26, 2024 4:05 PM July 26, 2024 4:05 PM
13
रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट
पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी ही काळजी घ्यावी, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्...