January 10, 2026 3:11 PM January 10, 2026 3:11 PM
26
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्यात पुण्यातल्या प्रमुख नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे याही यावेळी उपस्थित होत्या. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणं, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आरोग्य सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि झोप...