June 16, 2025 3:17 PM June 16, 2025 3:17 PM

views 61

पुणे पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत – काँग्रेस

कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी माणगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कुंडमळा इथं पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येतात हे माहीत असतानाही हा धोकादायक पूल खुला का ठेवला असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.    सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडल्यावरून सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. महायुती सरकारने महापुरुषांच्या पुत...

June 16, 2025 12:00 PM June 16, 2025 12:00 PM

views 10

पुणे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं २ जणांचा मृत्यू, ३२ जण जखमी

पुणे जिल्ह्यात आज तळेगाव नजीक कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याने २ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. काही पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचं पथक तसंच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. या दुर्घटनेतून सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवार असल्याने या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यापैकी काही जण पुलावर उभे असतानाच पूल कोसळला आणि अनेक जण नदीत पडले.   य...