February 22, 2025 8:03 PM February 22, 2025 8:03 PM

views 23

Pune ATP Challenger: जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत जोडीला विजेतेपद

पुणे ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बायल्डन आणि मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस यांचा ३-६, ६-३, १०-० असा पराभव केला. अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीची सुरुवात संथ झाली. त्यामुळे त्यांनी पहिला सेट ३-६ असा गमावला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत टायब्रेक करण्यात आला. निर्णायक टायब्रेकमध्ये, भारतीय जोडीने एकही गुण न गमावता सेट १०-० असा जिंकला.