November 14, 2025 3:22 PM November 14, 2025 3:22 PM

views 20

पुण्यात नवले पुलावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू

पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये एक चारचाकी वाहन अडकलं आणि त्यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

August 11, 2025 7:20 PM August 11, 2025 7:20 PM

views 8

पुण्यात वाहन दरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू, २९ जखमी

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून ८ जणींचा जागीच मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदतही त्यांनी...

December 23, 2024 6:34 PM December 23, 2024 6:34 PM

views 15

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्यांना डंपरने चिरडल्याने ३ जणांचा मृत्यू

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. ही घटना पुणे शहरातल्या वाघोली चौक परिसरात काल मध्यरात्री घडली. मोटार वाहन कायदा आणि आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. डंपरचा चालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून ते काल रा...

June 25, 2024 10:00 AM June 25, 2024 10:00 AM

views 13

पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

  महाराष्ट्रात पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याचे आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आ...

June 17, 2024 10:23 AM June 17, 2024 10:23 AM

views 13

पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या निर्णयात चुका असल्याचा चौकशी समितीचा अहवाल

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना, बाल न्याय मंडळानं अनेक चुका केल्या असल्याचा ठपका पाच सदस्यांच्या समितीनं ठेवला आहे. मंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीनं तयार केलेल्या १०० पानी अहवालात बाल न्याय मंडळाद्वारे अनेक चुका झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.