October 19, 2025 10:42 AM

views 156

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारभार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी देशाच्या विविध भागातले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अटलांटा, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. ट्रंप यांच्या हुकुमशाही कारभारामुळे अमेरिकी लोकशाही धोक्यात आली असल्याचं निदर्शकांचं म्हणणं आहे. स्थलांतरीतांविरुद्ध उगारलेला बडगा, आरोग्यसेवेच्या तरतुदीत कपात आणि रस्त्यांवर सुरक्षा दलांची नेमणूक ह्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ट्रंप विरोधी नेत्यांनी मात्र नागरिकांना शांततापूर्ण नि...

July 20, 2025 6:54 PM

views 26

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांचं कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात, आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांनीही सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन सुरू केलं.  या आंदोलनाला शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. वेतन, लिंगभेद, स्वतंत्र संचालनालय या आणि अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेनं अलिकडेच मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं होतं. मात्र सरकारनं त्याची दखल न घेतल्यानं संघटनेनं १८ जुलैपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे..

December 20, 2024 8:19 PM

views 60

संसद भवनाच्या आवारात आंदोलन

भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी या खासदारांची मागणी होती.   विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्य्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झाले...

September 9, 2024 6:34 PM

views 28

गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

मानधनवाढ, पेंशन आणि अन्य मागण्या प्रशासनानं मान्य न केल्यानं गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी आज मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. ‘सिटू’ संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. या आंदोलनात हिवताप प्रतिबंधक फवारणी कामगारही सहभागी झाले होते.